जळगावमहाराष्ट्र

आस्था महिला मंडळाच्या महिलांनी केला पत्रकारांचा सत्कार……..

प्रतिनिधी – एरंडोल येथील आस्था महिला मंडळांच्या महिलांनी पत्रकारांचा सत्कार करून स्नेहभोजनाचा कार्यक्रम राबविला.
       याप्रसंगी आस्था महिला मंडळाच्या सदस्य शोभा साळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना खंत व्यक्त केली की , पत्रकारांकडून आपली बातमी छापून येण्याबाबत सर्वजण अपेक्षा व्यक्त करतात परंतु पत्रकार दिनानिमित्त कुठल्याही राजकीय , शासकीय,  सामाजिक , शैक्षणिक विभागातर्फे याचे दखल घेतली जात नाही. त्यानिमित्ताने महिला मंडळातर्फे याची दखल घेत पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी प्रयत्न केले व सर्व पत्रकारांचा सन्मान करून सर्वांसोबत स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
त्यासोबत महिला मंडळाच्या सदस्या सौ नंदा शुक्ला यांनी आपले मनोगत व्यक्त करतात पत्रकाराच्या सन्मानार्थ एक लेख प्रस्तुत करून  वर्तमान पत्राच्या सुरुवातीला पत्रकार चे स्वरूप कसे असायचे व आजच्या पत्रकारातील फरक कसा आहे याचे उदाहरण आपल्या लेखात प्रस्तुत केले.  आजच्या ए. आय. डिजिटल युगात सुद्धा  प्रिंट मीडिया चे पत्रकार कर्तव्य कसे पार पाडत आहे. याबद्दल सर्व पत्रकारांचे कौतुक केले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. मोहन शुक्ला हे होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार अहिरराव सर , बी.एस. चौधरी , आल्हाद  जोशी, कमर अली सय्यद , जावेद मुजावर , सुधीर शिरसाठ , कैलास महाजन , शरद महाजन , राजधर महाजन , नितीन ठक्कर , पंकज महाजन , दिपक बाविस्कर , उमेश महाजन , विक्की  खोकरे , शैलेश चौधरी , प्रमोद चौधरी , शैलेश चौधरी , कुंदन सिंह ठाकुर , विज्ञान पाटील ,   यांचा सत्कार करून महिला मंडळांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व त्यांच्या परिवाराला सुद्धा सन्मानित केले.
    या प्रसंगी महिला मंडळाच्या आरती ठाकूर , नंदा शुक्ला , शोभा साळी , शकुंतला अहिरराव, डॉ . राखी काबरा ,  चंद्रकला जैन , दमयंती ठक्कर , निशा ठक्कर , डॉ. गीतांजली ठाकूर , शितल चौधरी , भारती साळुंखे , संगीता सोनवणे , मीनाक्षी पाटील , गौरी मानूधने , वंदना चौधरी , सुधा दुबे , निता तिवारी , शालिनी कोठावदे , आशा देवरे , देवरे मॅडम ,  , ज्योती वाणी , सारिका पाटील , सावंत मॅडम , सुमन चौधरी , बबीता भावसार,  शशिकला मानुधने , क्षमा साळी , रश्मी दंडवते , संध्या महाजन , जयश्री पाटील,  आदी महिला उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून नवनीत आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणालिनी पाटील यांनी सुद्धा या कार्यक्रमास भेट दिली  व महिला मंडळाच्या सदस्यांनी एकत्र येत हळदीकुंकू हा कार्यक्रम साजरा केला.
    महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. आरती ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सौ. शोभा साळी यांनी केले. आभार प्रदर्शन सो. नंदा शुक्ला यांनी केले.
      

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button