एरंडोल येथे महिला व मुलींसाठी बापाची ओळख करून देणारे काळजाला भिडणारे वसंत हंकारे यांचे व्याख्यान .

प्रतिनिधी – एरंडोल पारोळा भडगांव चे नवनिर्वाचित आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवासेना एरंडोल शहर व तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने ” बाप समजून घेतांना ” या विषयावर वसंत हंकारे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान रा.ति. काबरे विद्यालयाच्या प्रांगणात दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे.
एरंडोल शहर व परिसरातील शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थीनी त्यांचे आई वडील यांनी या व्याख्यानाला अवश्य उपस्थिती द्यावी. असे आवाहन युवासेनेचे जिल्हाध्यक्ष शिवसेना प्रा. मनोज पाटील , शिवसेनेचे पदाधिका-यांनी केले आहे.
” बाप समजून घेताना ” या विषयावर श्री वसंत हंकारे यांचे अनेक व्याख्यान झालेली असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे .आपल्या जीवनात आई-वडील आपल्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत, याची जाणीव या व्याख्यानातून होणार आहे. तेव्हा पंचक्रोशीतील सर्व शाळेतील विद्यार्थी ,विद्यार्थिनी सोबत आई-वडील यांनी उपस्थितीचे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.