जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

शास्त्री फार्मसीत व्यक्तिमत्व विकासावर कार्यशाळा

प्रतिनिधी – शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी  एरंडोल येथे सोमवार दि. 0३ फेब्रुवारी २०२५ रोजी व्यक्तिमत्व विकास या विषयावर जगविख्यात प्रा. सुरेश पांडे यांची कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर पराग कुलकर्णी यांनी केली व प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सूत्र संचालन प्रा. योगेश्वरी लोहार यांनी केली. त्यानंतर प्रा. सुरेश पांडे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्वाचे अनेक पैलू विद्यार्थ्यांसमोर मांडले. संभाषण कौशल्य, स्मरणशक्तीचा विकास, वेळेचा सदुपयोग, ताण व्यवस्थापन, निर्णय घेण्याची क्षमता, गट चर्चा आणि वैयक्तिक मुलाखत यांचे महत्व तसेच इंटरव्यू फेस करताना विद्यार्थ्यांना कुठल्या अडचणी येतात व त्यावर आपण कसे मात केले पाहिजे यावर सखोल मार्गदर्शन प्रा. सुरेश पांडे यांनी त्यांच्या अनोख्या शैलीतून विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास घडवून समाज व देश सुदृढ बनवा असा मोलाचा संदेश दिला.
या कार्यशाळेची संकल्पना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय शास्त्री व सचिव सौ. रूपा शास्त्री यांचे होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. श्रद्धा शिवदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. जावेद शेख, प्रा. राहुल बोरसे व महाविद्यालयातील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button