क्रीडाताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

एरंडोल शहरात मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे भव्य दिव्य मॅरथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद .

प्रतिनिधी एरंडोल –  शहरात मैत्री सेवा फाउंडेशन हि सामाजिक संस्था नेहमीच नवनवीन संकल्पना राबवून विविध शेत्रात सामाजिक काम करत असते , सध्या एक तास आरोग्यासाठी या संकल्पने अंतर्गत ”  एरंडोल रन मॅरेथॉन ” ( Erandol Run Marathon) चे आयोजन  प्रथमच मैत्री सेवा फाऊंडेशन मार्फत एरंडोल तालुक्या करण्यात आले आहे.या उपक्रमाचे प्रयोजन त्रिवेदी फाऊंडेशन तर्फे – ॲड.श्री.ओमजी त्रिवेदी व बालाजी गृप तर्फे – प्रसादजी काबरा . या दोन्ही दातृत्व प्रिय व्यक्तीनं मार्फत जनजागृतीच्या शाश्वत हेतूने करण्यात येत होते .
सदरील मॅरेथॉन  9 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजेपासून रा.ती. काबरे विद्यालय एरंडोल येथून सुरू झाली , मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी सहभाग फी 100 /- ठेवण्यात आलेली आहे त्यात स्पर्धकाला एक किट देण्यात येणार आहे त्यात (टी- शर्ट, मेडल, पाणी , ब्रेकफास्ट,गुलकोविटा,प्रथम उपचार व्हाउचर इत्यादी ) असेल  आतापर्यंत सुमारे 3000 स्पर्धकांनी आपली सहभाग नोंदवला या उपक्रमात पुरुष व महिला यांचे विभक्त गट असून एक गट खुला ठेवण्यात आला होता ज्यात एरंडोल तालुक्या बाहेरील स्पर्धकांनी सुद्धा सहभाग टसेच एरंडोल तालुका व तालुक्या बाहेरील एकूण 3050 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला व त्यात प्रत्येक गटाला वेगवेगळी आकर्षक बक्षिसे सुद्धा ठेवण्यात आलेली होती.
सदरील गट
             पुरुष गट                              महिला गट
7KM ( वय 16 ते 35 वर्ष )                   3KM ( वय 08 ते 15 वर्ष )
5KM ( वय 36 ते वरील सर्व )                3KM ( वय 16 ते 35 वर्ष )
3KM ( वय 08 ते 15 )                     3KM ( वय 36 ते वरील सर्व )
7KM (एरंडोल तालुक्याबाहेरील वय 15 वर्ष ते वरील सर्व महिला / पुरुष )

3KM ( वय 08 ते 15 )  महिला   
प्रथम पारितोषिक :-  कुमारी दिव्या  
           
3KM ( वय 16 ते 35 वर्ष )  महिला
प्रथम पारितोषिक :-   कुमारी जान्हवी

3KM ( वय 36 ते वरील सर्व )  महिला
प्रथम पारितोषिक :-  उर्मिला पाटील

3KM ( वय 08 ते 15 )  पूरूष
प्रथम पारितोषिक :-  प्रथमेश  जगताप    
           
5 KM ( वय 36 ते वरील सर्व ) पूरूष
प्रथम पारितोषिक :-  विठ्ठल मराठे 

7 KM ( वय 16 ते 35 वर्ष ) पूरूष
प्रथम पारितोषिक :-   प्रशांत जाधव               
7KM (एरंडोल तालुक्याबाहेरील वय 15 वर्ष ते वरील सर्व ) या गटांत
प्रथम पारितोषिक :-  सुनील बारेला ( चोपडा )

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मैत्री सेवा फाऊंडेशन चे सर्व सदशया वा पदाधिकारी वा सदस्य :- सागर महाजन,  पियूष चौधरी , पंकज पाटील , तुषार महाजन , निखिल शेंडे , निलेश बाकळे , गौरव महाजन , हेमंत पाटील शुभम महाजन , मनोज महाजन , संतोष जयस्वाल , ज्ञानेश्वर महाजन , विनित पाटील ,  चेतन शिंपी , प्रितेश पाटील ,  जयवीर पाटील व अनेक स्वयंसेवक व हितचिंतकांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button