वाहनांसह २ लाख ८० हजार रुपये किंमतीचा गांजा पकडला. एकाला अटक.!

प्रतिनिधी एरंडोल – कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत व परीसरात गांजा विक्री होत असल्याची गुप्त बातमी कासोदा पोलिसांना मिळाली होती त्यावरून कासोदा पोलीस हे गेल्या पाच दिवसापासून त्या मार्गावर होते परंतु पहिले चार दिवस त्यांना त्यात अपयश आले व पाचव्या दिवशी२५/०२/२०२५ रोजी पहाटे ३ ते ५ वाजेदरम्यान त्यांना एम एच् १९ डी वाय २७१७ या पलसर मोटरसायकलीवर गांजा विक्री करणारा एरंडोलकडून कासोदा गावाकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर वनकोठे गावाजवळ एक संशयित इसम त्याच्या मोटरसायकलीवर प्लॅस्टिकच्या गोणीत गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी सापळा रचून त्याच्या मोटरसायकलीचा पाठलाग करून थांबवली. त्याच्या मोटरसायकल वरील गोणी तपासली असता त्यात खाकी रंगाचे चौकोनी आकाराचे पुडे मिळून आले. ते फोडून तपासले असता त्यामध्ये गांजा मिळून आल्याने आरोपी यास पोलीस स्टेशनला आणले.
सदर पथकाने संशयित इसम अजय रवींद्र पवार वय २७ वर्ष राहणार सोनबर्डी तालुका एरंडोल याला ताब्यात घेऊन त्याचे कडून १९ किलो गांजा एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा व मोटरसायकल नव्वद हजार रुपये किमतीची असा एकूण दोन लाख ऐशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादीनुसार गांजाची वाहतूक करणाऱ्या इसमाविरुद्ध गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे (एन डी पी एस) अधिनियम १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीस दिनांक २६/०२/२०२५ रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर -पवार ,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार सपोनि निलेश राजपूत ,पोलीस उपनिरीक्षक दत्तू खुळे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदलाल परदेशी, पोलीस नाईक अकील मुजावर, पोलीस नाईक किरण गाडी लोहार, नरेंद्र गजरे, पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे, लहू हटकर यांनी कारवाई केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास सपोनीं नीलेश राजपूत करीत आहेत.सदर गुन्ह्यात आरोपीकडून अजून काही नावे समोर येण्याची शक्यता असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.