शास्त्री फार्मसी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

प्रतिनिधी – शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, येथे २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी मराठी भाषेच्या महत्वाची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व संस्थेचे सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्याहस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे सांस्कृतिक महत्त्व आणि तिच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीच्या सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या संस्थेच्या वतीने नियमितपणे निबंध स्पर्धा, कविता वाचन व संवाद सत्र अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे संस्थेच्या प्रशासनाने सांगितले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात कसा अधिक प्रभावीपणे करावा याबद्दल संस्थेचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. तसेच, मराठी साहित्य व संस्कृतीचा गौरव करणारे विविध पुस्तकांचे प्रदर्शनेही आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सांगता प्राध्यापक जावेद शेख यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून आणि मराठी भाषेच्या अस्तित्वाची शपथ घेत पूर्ण करण्यात आली.