महाराष्ट्रशैक्षणिक
रा.ति.काबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी दिपा श्रीकांत काबरा यांची नियुक्ती…..!

प्रतिनिधी एरंडोल – येथील रा.ति.काबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना झंवर या सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर दिपा श्रीकांत काबरा यांची नियुक्ती करण्यात आली.संस्थाध्यक्ष शरद काबरा, समन्वय समिती अध्यक्ष संजय काबरा, उपाध्यक्ष श्रीकांत काबरा, शालेय समितीचे चेअरमन राजु मणियार, डॉ.नितीन राठी व इतर पदाधिकाऱ्यांनी दिपा श्रीकांत काबरा यांचे अभिनंदन केले.
विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याकरीता व शाळेची गुणवत्ता वाढीसाठी आपण शर्थीचे प्रयत्न करू असे दिपा काबरा यांनी आश्वासित केले आहे.त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.