जळगावमहाराष्ट्र

एरंडोल महाविद्यालय स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त नेत्रदान कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी – एरंडोल येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मृत्यूनंतर नेत्रदान या जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.अमित दादा पाटील यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील ,उपप्राचार्य प्रा.डॉ.अरविंद बडगुजर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय गाढे यांनी नेत्रदानाचे महत्त्व व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला तसेच या जनजागृती पर कार्यक्रमात नेत्रदान करण्यासंबंधीची शपथ घेण्यात आली तसेच 30 विद्यार्थ्यांनी नेत्रदानाचे अर्ज भरून घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी स्वयंसेवकांना नेत्रदान करण्यासंबंधी समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. सविता पाटील यांनी केले. तर सहाय्यक कार्यक्रमाधिकारी योगेश येडाईत यांनी आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button