एरंडोल येथे महिला दिनी विवाहीत महिलांचा मॅरेथॉन स्पर्धेत उत्साह

शहरातील महिला मंडळांचे आयोजन. १५० विवाहीतांचा सहभाग
एरंडोल (प्रतिनिधी) – येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी (फक्त विवाहीत) मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. शहरातील १५ महिला मंडळांकडून घेण्यात आलेल्या सदर मॅरेथॉन स्पर्धेत १५० महिलांनी आपला सहभाग नोंदविला.
सदर स्पर्धा पद्मालय फाटा ते डॉ. जहागिरदार यांच्या मळ्यापर्यंत (अंतर ५ कि. मी.) ठेवण्यात आली होती. त्यांचेही स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य लाभले. सुरूवातीस ओमशांती केंद्राच्या प्रमुख पुष्पा दिदी यांच्या हस्ते झेंडी दाखवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
पहिल्या गटात प्रथम क्रमांक मिनाक्षी चंद्रकांत पाटील, द्वितीय कविता हिलाल पाटील, तृतिय वैशाली दिपक पाटील आणि उत्तेजनार्थ जयश्री भिमसिंग राजपूत विजेत्या ठरल्या. दुसर्या गटात प्रथम उर्मिला संजय पाटील, द्वितीय डॉ. जुमाना बोहरी, तृतिय शिल्पा योगेश काबरा तर उत्तेजनार्थ अर्चना राहुल तिवारी, ज्योती सतिष चिंचोली विजयी ठरल्या. सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण आमदार अमोलदादा पाटील यांच्या पत्नी मृणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना उपस्थित सर्व महिला-भगिनींना मृणाल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. सर्व महिलांना घरी पोहचविण्याची सुविधा बचपन इंग्लिश स्कूलच्या संस्थापिका सुरेखा पाटील यांनी मोफत उपलब्ध करून दिली. सदर मॅरेथॉन यशस्वीतेसाठी ज्येष्ठ महिलांसह सर्व महिला मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. विशेष म्हणजे नवविवाहीता, पन्नाीश ओलांडलेल्या विवाहीतांनी पांढरा ड्रेस, कॅप परिधान केलेली होती.