एरंडोल येथे दीपस्तंभ तीन दिवसीय व्याख्यानमाला संपन्न.

प्रतिनिधी एरंडोल;-सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील स्वर्गीय के.एम महाजन, स्वर्गीय डॉ .ब. तु.राठी, स्वर्गीय डॉ. अनिल महाजन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एरंडोलचे सुपूत्र युवा व्यक्तीमत्व प्रा. यजुर्वेेंद्र (अमोल) महाजन ,यांच्या संकल्पनेतून दीपस्तंभ प्रेरणादायी व्याख्यानमालेचे आयोजन .१५ ते१७ डिसेंबर २०२४ सायंकाळी ७ते९ या वेळेत रा.ति. काबरे विद्यालयाच्या प्राणांगणावर करण्यात आले होते. व्याख्यानमालीचे हे १७ वर्ष होते
दि१५ डिसेंबर रोजी संपादक सकाळ महाराष्ट्र सम्राट फडणीस, शितल पवार संपादक सकाळ पुणे यांनी आपल्या प्रथम पुष्पात मिडीया व सोशल मिडीया आणि आपण या विषयावर संपूर्ण मार्गदर्शन केले.दि१६ डिसेंबर रोजी अभिनेत्री, लेखिका मृणाल कुलकर्णी यांनी माझा जीवनाचा प्रवास या विषयावर सविस्तर विवेचन केले. श्रोता वर्गाकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. दि.१७ डिसेंबर रोजी “अरे संसार संसार” या बहिणाबाईंच्या कविता व गाण्यांची सांगीतीक मैफल परिवर्तन संस्था, जळगांव यांनी सादर केला.
सदर व्याख्यानमाला दीपस्तंभ व आर्यन फाऊंडेशन जळगांव, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, विवेकानंद केंद्र एरंडोल यांचे संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. सदरची व्याख्यानमालाही शहर वाशियांसाठी एक वैचारिक पर्वणीच असते . शहरातील अबल वृद्ध., विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या प्रमाणात वैचारिक प्रेरणा घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमास रा.ति. काबरे विद्यालय , दि. शं. पाटील महाविद्यालय यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र पाटील समन्वयक दीपस्तंभ व्याख्यानमाला,डॉ. नरेंद्र पाटील, जयश्री पाटील माजी नगराध्यक्षा, क्षमा साळी, सेवानिवृत्त प्रा. गणेश महाजन, डॉ. नितीन राठी, बी.के. धूत, नरेश डागा, मंगेश पाटील, व सर्व सभासदांनी मेहनत घेतली.