क्राईम

अल्पवयीन मुलीला फूस लाऊन पळविले..

प्रतिनिधी अमळनेर:- तालुक्यातील भरवस येथे कामानिमित्त आलेल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला फूस लाऊन पळवून नेल्याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
          मध्यप्रदेशातून शेतीच्या कामानिमित्त अमळनेर तालुक्यातील भरवस येथे स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील पंधरा वर्षीय मुलगी इयत्ता दहावीत शिकत असून तिचे दहावीचे पेपर सुरू होते. ११ रोजी रात्री आठ वाजता सदर अल्पवयीन मुलगी शौचाला जाऊन येते असे सांगून बाहेर पडली. बराच वेळ झाला तरी ती परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता ती मिळून आली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी मारवड पोलिसांत त्यांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लाऊन पळवून नेल्याची तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button