आई हॉस्पिटल व डॉ कविता दराडे येवला ह्यांचा संयुक्त विद्यमानाने भव्य वंधत्व निवारण शिबिर

प्रतिनिधी – भव्य वधत्व्य निवारण शिबिर ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त दि १६ मार्च रविवार रोजी एरंडोल तालुका मेडिकल ( डॉक्टर्स) असोसिएशन , आई हॉस्पिटल व डॉ कविता दराडे येवला ह्यांचा संयुक्त विद्यमानाने भव्य वंधत्व निवारण शिबिर आई हॉस्पिटल एरंडोल येथे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरात येवला,नासिक येथील प्रसिद्ध आय वि एफ तज्ञ डॉ कविता दराडे यांनी ३१ जोडप्यांची निःशुल्क तपासणी ( सोनोग्राफी, सिमेन अनालेसिस ई) करून योग्य मार्गदर्शन केले
सदर शिबिराचे उद्घाटन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सुधीर काबरा व माजी उपनगराध्यक्ष तथा नियोजन बोर्डाचे सदस्य डॉ सुरेश पाटील ह्यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले सदर प्रसंगी असोसिएशनचे सचिव डॉ राहुल वाघ डॉ किरण पाटील डॉ आर टी पाटील डॉ अमोल बोरणारकर डॉ पळशीकर डॉ किशोर पाटील डॉ गीतांजली ठाकूर डॉ देवेश वाघ डॉ सौ प्रतीक्षा पाटील डॉ सौ गायत्री पाटील डॉ सौ मोहिनी वाघ डॉ सौ राखी काबरा पी आर ओ शेखर बुंदेले व तालुक्यातील सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास शहरातील बहुसंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी भेटी देऊन शुभेच्या दिल्या. रात्री ८-oo वाजता डॉ दराडे मॅडम यांचे न्यू ॲप्रोच इन इन्फर्टलिटी ह्या विषयावर हॉटेल कृष्णा इन येथे लेक्चर व स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव डॉ राहुल वाघ डॉ सुधीर काबरा डॉ किरण पाटील व शेखर बुंदेले ह्यांनी प्रयत्न केले