क्राईमजळगावमहाराष्ट्र

वाळूमाफियांकडून तलाठ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न.

प्रतिनिधी एरंडोल – वाळूची अवैधरीत्या वाहतूक करणा-या tractor चालकाने तलाठ्याच्या
मोटरसायकलला धडक देवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.तलाठ्याच्या
मोटारसायकलला धडक दिल्यानंतर tractor बंद पडल्यामुळे चालक फरार झाला असून
वाळूमाफियांची दहशत व दादागिरी केंव्हा संपणार असा प्रश्न उपस्थित केला
जात आहे.

    याबाबत माहिती अशी की,तहसीलदार प्रदीप पाटील यांना रवंजा परिसरासह
कांताई बंधारा येथून वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची
माहिती मिळाली.तहसीलदार प्रदीप पाटील यांनी मंडळ अधिकारी संजय साळुंखे
यांना रवंजा परिसरात गौण खनिजाची वाहतूक सुरु असून त्यांचेविरोधात कारवाई
करण्याचे कळवले.मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांनी कढोली (ता.एरंडोल) येथील
तलाठी नितीन तुकाराम पाटील यांना माहिती देवून रवंजा परिसरात जाण्याचे
सांगितले.रिंगणगाव येथील मंडळ अधिकारी संजय साळुंखे,तलाठी नितीन
पाटील,सावदा प्रा.चाचे तलाठी कडू इंगळे,खर्चीचे तलाठी सृष्टी खांदे,तलाठी
विश्वास बरगे,कोतवाल भूषण म्हस्के आदी महसूल कर्मचा-यांचे पथक त्यांच्या
मोटारसायकलींवरून रवंजा येथून कांताई बंधारा या ठिकाणी जात असतांना खेडी
फाट्याजवळ एक विना क्रमांकाचे tractor वाहतूक करताना आढळून आले.महसूल
पथकाने tractor थांबवून चालकाकडे वाळू वाहतुकीबाबत परवाना विचारला असता
त्यांच्याकडे कोणतेही परवान्याचे कागदपत्र नसल्याचे सांगितले.महसूल
पथकाने सदरचे tractor तहसीलदार कार्यालय येथे घेवून येण्यास
सांगितले.tractor एरंडोलकडे आणत असतांना खडके बुद्रुक गावाजवळ संशयित
राजू रामचंद्र नन्नवरे हा आला आणि चालकास खाली उतरवले आणि tractor भरधाव
वेगाने दत्त मंदिराच्या दिशेने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.संशयित राजू
नन्नवरे याने तलाठी नितीन पाटील यांच्या मोटारसायकल क्रमांक एम एच ५४ ए
५५४२ ला जोरदार धडक दिल्यामुळे ते खाली पडले तलाठी पाटील व मोटार सायकल
tractorमध्ये अडकल्यामुळे आणि रस्ता चढावाचा असल्यामुळे ते बंद
पडले.tractor बंद पडल्यामुळे संशयित राजू नन्नवरे हा फरार झाला.महसूल
पथकातील कर्मचा-यांनी तलाठी नितीन पाटील यांना बाहेर काढले त्यांच्या
पायाला व खांद्याला गंभीर दुखापत झाली.tractor बंद पडल्यामुळे सुदैवाने
तलाठी नितीन पाटील थोडक्यात बचावले.याबाबत तलाठी नितीन पाटील यांनी
दिलेल्या तक्रारीवरून संशयित राजू नन्नवरे याच्या विरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस तपास करीत आहेत.दरम्यान तालुक्यात वाळूमाफियांची दहशत वाढली असून
यापूर्वी देखील उत्राण येथे प्रांताधिका-यांसह महसूल कर्मचा-यांवर वाळू
माफियांनी प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला
होता.वाळूमाफियांना राजकीय आशीर्वाद असल्यामुळे त्यांची दहशत दिवसेंदिवस
वाढतच आहे.उत्राण परिसरातील गिरणा नदी पात्रातून दररोज रात्रभर वाळूची
चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असून त्यांचेविरोधातही कारवाई करण्याची
मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button