जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

युफोरिया २०२५: शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीत रंगणार उत्साहाचा महोत्सव.


प्रतिनिधी एरंडोल :- शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीत वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ च्या विविध कार्यक्रमांना १ एप्रिल २०२५ पासून उत्साहात प्रारंभ झाला. या आठवडाभर चालणाऱ्या महोत्सवात क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, माजी विद्यार्थी मेळावा आदींचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कौशल्यांना वाव मिळावा यासाठी ५ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘युफोरिया २०२५’ च्या भव्य आयोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने केले आहे.स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री आणि सेक्रेटरी सौ. रूप शास्त्री यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

युफोरिया २०२५’ च्या निमित्ताने प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती
यंदाच्या स्नेहसंमेलनात वस्त्रोद्योग मंत्री मा. खासदार संजयभाऊ सावकारे, मा. खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, मा. आमदार अमोलदादा पाटील, मा. किशोरभाऊ काळकर, जिह्वा परिषद सदस्य मा. प्रतापदादा पाटील आणि म. रा. तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव मा. देवेंद्र दांडगव्हाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button