क्राईमजळगावमहाराष्ट्र
पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या कार्यालयासमोर डफ बजाओ आंदोलन…..!

प्रतिनिधी एरंडोल – माळपिंप्री येथील दोन गटात झालेल्या वाद व मारहाण प्रकरणी दुसऱ्या गटातील आरोपींवर अनुसूचित जाती जमाती ॲट्राॅसिटीनुसार गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी भिल समाज विकास मंच या संघटनेतर्फे नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर २९ एप्रिल २०२५ रोजी डफ बजाओ आंदोलन करण्यात आले.यावेळी संघटनेतर्फे पोलीस महानिरीक्षक, नाशिक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे, आदिवासी एकता परिषद महासचिव करण सोनवणे, एरंडोल तालुकाध्यक्ष भैय्या मोरे,सागर वाघ,निहाल सोनवणे, सखाराम मोरे ,मच्छींद्र मोरे, लक्ष्मण जावळे,राजधर मोरे, विष्णू मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, पंकज सोनवणे,सागर सोनवणे, राहुल मोरे,दिपक सुर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.