जळगावमहाराष्ट्र

कायमस्वरुपी अभियंत्याची नियुक्तीसाठी कासोदेकरांच्या आंदोलनाला यश

प्रतिनिधी – कासोदा येथील विज केंद्रात गेल्या  ९ महिन्यांपासून अधिकार्याविना कसाबसा कार्यभार सुरु होता. या प्रश्नी गावकर्यांनी रस्ता रोको बाबत वरिष्ठ विज अधिकार्यांना लेखी निवेदन दिले होते पाठपूरावा देखिल सुरु होता.त्याची दखल घेत आज दि.२३ रोजी धरणगाव येथील कार्यकारी अभियंता  सोनगिरे साहेब, एरंडोलचे उपकार्यकारी अभियंता राजपाल गेडाम साहेब हे स्वतः कासोदा येथे आले व कासोद्यासाठी कायमस्वरुपी सहाय्यक अभियंता आकाश देसले यांची नियुक्ति केल्याचे पत्र आंदोलनकर्यांना दिले आहे.
याकामी कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि  निलेश राजपूत साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. मतदार संघाचे  आमदार अमोलदादा पाटील यांनी देखिल याकामी अनमोल असे सहकार्य केल्यामुळे हा प्रश्न ताबडतोब निकाली निघाला आहे.सपोनि राजपूत साहेब व आ.अमोलदादा यांचे गावकर्यांनी मनापासून आभार मानले.
   या प्रसंगी आ.अमोल दादा हे आपल्या सुदैवाने सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत,त्यामुळे कासोद्यासाठी अजून एक स्वतंत्र सबस्टेशन मंजूर करुन घ्यावे, ही आग्रहाची विनंती करण्यात आली.



Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button