एरंडोल जवळ उभ्या ट्रॅक मधून २ लाख ३५ हजार किमतीचे मोटार पंप लंपास.

प्रतिनिधी – एरंडोल येथील म्हसावद रस्त्यावरील उमरदे रस्त्यावरील उभ्या ट्रॅक मधून पाण्याचे सुमारे २ लाख ३५ हजार किमतीचे मोटार चोरीस गेल्याची घटना घडली असून एरंडोल पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत एरंडोल पोलिस स्टेशन वरुन मिळालेल्या माहितीनुसार चिपडा ता.लोधिका जि.राजकोट,गुजरात येथील एका कंपनी मधुन पाण्याचे सबमार्सिबल रोलपंप मोटर सोलर पंप मोटार असा माल घेऊन ट्रक क्र.जी. जे.03 बी. झेड.7465 ने चालक लाखाभाई रताभाई बोरिचा व क्लिनर केशव भाई पटेल हे जालना येथे जाण्यासाठी निघाले असता त्यांचा ट्रक एरंडोल जवळील उमरदे गावाच्या पुढे गाडीत बिघाड झाल्याने ते गाडी रस्त्याच्या कडेला लाऊन झोपी गेले.याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सुमारे ९० हजार रुपयांचे २८ नग पाण्याचे सबमार्सिबल रोलपंप मोटर तर १ लाख ४५ हजार २९ नग सोलर पंप मोटार असा सुमारे २ लाख ३५ हजार किमतीचा माल लंपास केल्याची तक्रार ट्रक चालक लाखाभाई रताभाई बोरिचा यांनी केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवींद्र तायडे व हे. कॉ.काशिनाथ पाटील करीत आहेत.