पिंप्री बु.शिवारात गव्हाला पाणी भरायला गेलेल्या शेतकऱ्यावर रानडूकराचा हल्ला….!

प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील पिंप्री बु.शिवारातील गट नं.७७११ या शेतात ३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गव्हाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या हिरामण हसरथ हटकर वय ६० वर्षे,रा.पिंपळकोठा खु.या शेतकऱ्यावर रानडूकराने हल्ला करून जखमी केले.या हल्ल्यात हिरामण हटकर या शेतकऱ्याच्या दोन्ही मांड्यांना चावा घेऊन अक्षरशः दाताने फाडल्या असून सदर शेतकरी एरंडोल येथे एका खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल आहे.दरम्यान वन परिक्षेत्राचे अधिकारी डि.एस.पवार व सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा खुर्द येथील शेतकरी हिरामण हसरथ हटकर वय ६० वर्षे यांचे पिंप्री बु.शिवारात शेत असून शेतात गव्हाचे पिक आहे.३ मार्च २०२५ रोजी ते सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतात गव्हाला पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांच्यावर रानडुक्कराने हल्ला केला.त्यांनी आरडाओरडा केला असता त्यांचा मुलगा धावत आला.तर रानडुक्कराने त्याच्यावरही हल्ला केला असता त्याने स्वतःचा बचाव केला.त्यावेळी रानडुक्कर शेजारच्या शेतातील शेतकऱ्यांवर सुध्दा रानडुक्कराने हल्ला चढवला.मात्र परिसरातील शेतकरी जमा झाल्यामुळे रानडुक्कराने पळ काढला.
गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या हटकर यांना दुचाकीने एरंडोल येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्या दोन्ही मांड्यावर टाके टाकण्यात आले.वन परीक्षेत्राचे अधिकारी डि.एस.पवार यांनी खाजगी रूग्णालयात जाऊन गंभीर जखमी शेतकऱ्याकडून घटनेची माहिती घेतली.
दरम्यान या रानडुक्कराच्या जीवघेण्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर रानडुक्कराचा तातडीने बंदोबस्त करावा.अशी ग्रामस्थांची मागणी आहे.