जळगावमहाराष्ट्र

एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य.

प्रतिनिधी एरंडोल-येथील बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
    सदर बसस्थानकाचे नूतनीकरण ३० वर्षांपूर्वी झालेले असून त्याच्या देखभाली कडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.याठिकाणी   बसस्थानकावरील अनेक पंखे बंद आहेत.स्थानकात असलेले दुकानं वापरात नसल्याने त्यांची दुरावस्था होऊन पडझड झाली आहे.सदर पडक्या दुकानांमध्ये डुकरं व कुत्र्यांचा मुक्त संचार वाढला आहे.प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या आसनांची अवस्था खराब झाली आहे.काही ठिकाणी काँक्रिटीकरण झालेले नसल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य तयार झाले आहे.हिरकणी कक्ष बंद असल्याने महिला वर्गांमध्ये नाराजी आहे.पिण्याच्या पाण्याची टाकी अनेक दिवसांपासून स्वच्छ केलेली नसून या टाकीजवळ खूपच घाण आहे.याठिकाणची फळ विक्री, उपहारगृह,पुस्तकांचे दुकान,व जनरल स्टोअर्स बंद  अवस्थेत असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून याठिकाणी अनेक प्रवासी व रहिवाशी प्रातर्विधीसाठी उपयोग करतात.रात्री अपरात्री मद्यपी व गांजा पिणारे याठिकाणी बसलेले असतात.बसस्थानकाचे पुर्णपणे विद्रुपीकरण झाले असून स्वच्छता गृहांचे सांडपाणी वाहून जाण्याची सोय नसल्याने सांडपाणी परिसरातच तुंबत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.  गैरसोयींमुळे प्रवासीवर्गात नाराजी व्यक्त करण्यात येत
आहे.पावसाळ्यात बसस्थानकाच्या
आवारात सर्वत्र पाणी तुंबून चिखल होत असल्यामुळे प्रवाशांना अनेक
समस्यांना तोंड द्यावे लागते.
रात्री आठ नंतर धुळ्याकडून येणाऱ्या बसेस स्थानकात न येता प्रवाशांना रस्त्यावरच उतरवतात.यासाठी प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली असून काही महिला प्रवाशांनी याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रारी केल्या असून संबंधित  अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे बोलले जात आहे.बसस्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे आमदार अमोल पाटील यांनी जाहीर केले होते परंतु प्रत्यक्षात अजून कुठल्याही कामाला सुरुवात झाली नाही.दरम्यान यासर्व समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या समस्या दूर कराव्यात अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button