सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आराध्या महाजन राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून मेरिट मध्ये उत्तीर्ण

प्रतिनिधी – एरंडोल येथील न्यू इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थिनी आराध्या कृष्णा महाजन राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून
मेरिटमध्ये उत्तीर्ण झाली.
सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप, कालिकत केरळ द्वारे आयोजित सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप स्कीम अंतर्गत २०२४/२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये ती मेरीट मध्ये आल्याबद्दल प्रमाणपत्र व गोल्ड मेडल, रोख रक्कम असे मिळाले.तिच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन , व्हाइस प्रिन्सिपल सरला पाटील, वर्गशिक्षक अश्विनी महाजन,कल्पना खुणेपिंप्रे, तुळसाबाई खुणेपिंप्रे,हेमलता महाजन, भगवान महाजन, मनोहर महाजन,महेश महाजन, कविता महाजन, प्रशांत महाजन यांनी तिचे अभिनंदन केले आहे. आराध्या ही विखरण
येथील रहिवासी कृष्णा अरुण महाजन व देवयानी महाजन यांची मुलगी तर सामाजिक कार्यकर्ते कै. अरुण ओंकार खुणेपिंप्रे यांची नात आहे.