अपघातजळगावमहाराष्ट्र
पिंपळकोठ्याजवळ इको गाडीने जोरदार धडक दिल्याने लहान मुलगा जागीच ठार.

प्रतिनिधी एरंडोल :- तालुक्यातील पिंपळकोठा बु.येथे भरधाव वेगाने जाणा-या वाहनाने ४ वर्षीय लहान मुलाला धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की पिंपळकोठा बुद्रुक शुभम यौनाक्ष मासाळ वय- ४ वर्ष हा घराजवळ खेळत होता.त्याच वेळेस भरधाव वेगाने येणा-या इको गाडी क्रमांक एमएच १९ ईए ६८५६ ने शुभम यास जोरदार धडक दिली.वाहनाच्या धडकेने शुभम हा खाली पडल्याने त्याचे अंगावरून वाहनाचे चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.याबाबत शुभमचे आजोबा नारायण मासाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहनचालक मनोज मुखत्यारसिंग पाटील यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप पाटील करीत आहेत.