राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी एरंडोल:-येथे तहसील कार्यालय पुरवठा विभागातर्फे २४ डिसेंबर २०२४ रोजी पंचायत समिती सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश बिजेवार हे होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हास्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार संजय घुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार, एडवोकेट विलास मोरे, डॉक्टर अनिल देशमुख, शिवाजीराव अहिरराव, उज्वला देशपांडे हे मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले ,आभार प्रदर्शन ईश्वर बिर्हडे, यांनी केले.
ग्राहक जागृती व ग्राहक हक्क , सुरक्षिततेचा हक्क, वस्तू सेवा, या संबंधी माहिती घेण्याचा हक्क, आपली बाजू मांडण्याचा हक्क, याबाबत प्रमुख मान्यवरांनी सविस्तर विवेचन केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुयोग कुलकर्णी, सौरभ कोतकर ,ऋषिप्रसाद , ज्ञानेश्वर बडगुजर, सोनू ठाकूर, यांनी परिश्रम घेतले