ताज्या बातम्या
एरंडोल तालुक्यात महसूल सप्ताह अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.

प्रतिनिधी एरंडोल- तालुक्यात दिनांक 3 ऑगस्ट ,२०२५रोजी महसूल सप्ताह अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा व सार्वजनिक जागा जसे गायरान जमीन,स्मशान भूमी ,शाळा ,गावठाण, तलाठी व ग्रामपंचायत कार्यालय परिसरात याठिकाणी सर्व तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी एकूण ४३५ झाडांचे रोपण शेतकरी बांधव,नागरिक,सेवाभावी संस्था व विद्यार्थी यांच्या माध्यमातून यशस्वीपणे करण्यात आले.
सामाजिक वनीकरण मार्फत मानसिंग राजपूत यांनी रोप उपलब्ध करून दिली.
दरम्यान तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सपत्नीक परिवारासोबत टोळी शिवारात वृक्षारोपण केले. त्यावेळी नायब तहसीलदार तहसीलदार संजय घुले , मंडळाधिकारी श्रीमती सुनीता चौधरी ,ग्राम महसूल अधिकारी अमर भिंगारे ,सागर कोळी आणि महसूल सेवक पंकज भोई आदी उपस्थित होते.