एरंडोल तालूक्यात ढगफुटी सदृश पाऊस-अंजनी नदीला महापूर.

प्रतिनिधी एरंडोल – गेल्या दोन दिवसांपूर्वी ढगफुटी सदृष्य, मुसळधार पाऊस अंजनी नदीच्या उगम स्थानावर अतिवृष्टी झाल्यामुळे तसेच अंजनी नदीने प्रवाह बदलवल्यामुळे तालुक्यातील जुनी सोनबर्डी गावात पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. गावात अत्यंत गंभीर परीस्थिती निर्माण झाली होती. जवळजवळ 25 कुटुंबातील 60 ते 70 नागरिकांचा जीव धोक्यात होता. अशा वेळी स्थानिक प्रशासनाला या सर्वोतोपरी सहकार्य व मदतकार्य तातडीने राबविण्याचा सुचना केल्या. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे.
एरंडोल शहरातील फकीर मोहल्ला आणि कुंभार वाडा या ठिकाणी देखील काही कुटुंब पुराचा पाण्याचा वेढ्यात अडकली होती. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरिश महाजन, खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचेसमवेत आ. अमोलदादा पाटील यांनी प्रभावित भागांची पाहणी केली. सद्यस्थितीत सोनबर्डी गावातील सर्व नागरिकांना एसडीआरफच्या मदतीने जवळच्या आश्रमशाळेत स्थलांतरीत करून नागरीकांच्या भोजन आणि निवार्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा सुचना केलेल्या आहेत. तसेच एरंडोल शहरातील प्रभावित क्षेत्रात अडकलेल्या कुटुंबांना एसडीआरफ पथकाचा मदतीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
मतदारसंघातील पूरस्थितीवर आणि मदतकार्यावर लक्ष ठेवत सर्व संबंधित यंत्रणा संकटग्रस्तांसाठी तत्पर आहेत. अधिकार्यांना पंचनामे तात्काळ पूर्ण करून मदतीची प्रक्रिया सुरू करण्याचा सुचना यापुर्वीच दिलेल्या आहेत. नुकसानग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत प्रदान करण्यात येईल. यासह शासन आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्णपणे तत्पर असुन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवुन असल्याचे आ. अमोलदादा पाटील यांनी सांगितले.