जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

सुर्योदय जेष्ठ नागरिक संघटनेतर्फे दिनदर्शिकेचे प्रकाशन व जेष्ठ नागरिकांचा सन्मान…..!


प्रतिनिधी एरंडोल – येथे सुर्योदय जेष्ठ नागरिक संघटनेतर्फे ३० डिसेंबर २०२४ रोजी नववर्ष २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन व संघटनेच्या ८ सभासदांचा वाढदिवसानिमित्त टोपी, रूमाल व बुके देऊन माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अरूण कुमार माळी हे होते.जेष्ठ सभासद एस.एल.पारखे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
        प्रस्तावना संघटनेचे सचिव विनायक कुलकर्णी यांनी केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निंबा बडगुजर व प्रविण महाजन यांनी केले.या कार्यक्रम प्रसंगी जाधवराव जगताप,गणेश पाटील, भगवान महाजन, नामदेव बोडरे, ॲड.विलास मोरे, रविंद्र लाळगे,भागवत पाटील,सुपडू शिंपी, रघुनाथ कोठावदे, डॉ.पळशीकर आदी उपस्थित होते.शेवटी आभार प्रदर्शन पी.जी.चौधरी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button