जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

एरंडोलला रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

एरंडोल-एरंडोल तालुका औषध विक्रेता संघाच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष
जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान
शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.रक्तदान शिबिरात १११
रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिरासाठी जळगाव येथील रेड क्रॉस
सोसायटीचे सहकार्य लाभले.

    यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित
पाटील,युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील यांच्याहस्ते प्रतिमापूजन
करून रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.शिबिराचे आयोजन आई हॉस्पिटल
येथे करण्यात आले होते.शिबिरात संघटनेच्या सर्व पदाधिका-यांसह १११ जणांनी
रक्तदान केले.यावेळी अध्यक्ष अमित पाटील यांनी रक्तदानाबाबत समाजात
जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले.रक्तदानामुळे रुग्णांना जीवदान
मिळत असून या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन
केले.युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील यांनी औषध विक्रेता
संघटनेने राबवलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.जिल्हा औषध
विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांचे मार्गदर्शनाखाली
जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करून साडेतीन हजार रक्तदात्यांनी
रक्तदान करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात
आले.शिबिरासाठी सहकार्य केल्याबद्दल आई हॉस्पिटलचे संचालक डॉ.किरण पाटील
यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.शिबिरात सहभागी झालेल्या
रक्तदात्यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.शिबिरास दादासाहेब
पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.जे.पाटील,उपप्राचार्य डॉ.अरविंद
बडगुजर,माजी प्रभारी प्राचार्य एन.ए.पाटील,संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश
पाटील,उपाध्यक्ष राजेंद्र महाजन,सचिव गुणवंत पाटील,खजिनदार योगेश
बियाणी,माजी तालुकाध्यक्ष कैलास न्याती,उदय पाटील,मनोहर पाटील,संदीप
पाटील,कमलेश चौधरी,ललित पाटील,महेश पाटील,चेतन पाटील,अरविंद पाटील,प्रवीण
शिरोडे,भूषण पाटील,सागर पाटील,दीपक शेंडे यांचेसह संघटनेचे पदाधिकारी व
औषध विक्रेते उपस्थित होते.शिबिरासाठी औषध विक्रेता संघाच्या
पदाधिका-यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button