जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा सप्ताह संपन्न.


प्रतिनिधी एरंडोल:- येथील  श्रीमती के डी पाटील इंग्लिश मीडि यम स्कूल मध्ये
दि.३० डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीत लंगडी, खोखो, लांब उडी, गोळा फेक, रनिंग शर्यत, थ्रो बोल, लेमन स्पून अशा विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. संस्था अध्यक्ष अमित पाटील यांच्या हस्ते क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य दिनानाथ पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
                अभ्यासा एवढेच महत्त्व खेळाला देऊन बौद्धिक व शारीरिक दृष्ट्या विद्यार्थ्यांनी सक्षम व्हावे असे अमित पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. यावेळी शेखर पाटील, मीना चिंचोरे, प्रणाली भोसले, नीलप्रभा मेश्रामकर,शीतल पाटील, प्रिया आहेर, नूतन पाटील, ममता सुतार, भाग्यश्री चौधरी, भगवान मराठे, भगवान वाल्डे, रवींद्र चिंचोरे, आकाश नेटके ,माधुरी महाजन ,धनश्री महाजन, रूपाली पाटील अर्चना बनसोडे यांची उपस्थिती होती.
                  कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आशा शिंपी, निशा ठोसर, हर्षल पाटील यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button