जळगावमहाराष्ट्र
नौशाद पटेल भारतीय थल सेनेतून सेवा निवृत्त

विशेष प्रतिनिधि – यावल तालुक्यातील कोरपावली येथील सत्तार उस्मान पटेल यांचे चिरंजीव व फार्मा कंपनीतील मॅनेजर अकिल पटेल यांचे लहान बंधू नौशाद पटेल यांनी भारतीय सेनेत २००५ या वर्षी देशाची सेवा करण्यासाठी रुजू झाले त्यांनी वेगवेगळया इनफन्ट्री पंजाब मधील भट्टीन्डा व अहमद नगर , जम्मु कश्मिर, अश्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी २० वर्षे सेवा बजावली. अहमदनगर येथील २३ मॅकनाईज इनफन्ट्री येथून त्यांनी २०२५ अखेर भारतीय सेनेतून सेवा निवृत्त झाले .
या प्रसंगी समीर पटेल , अमीर पटेल , सत्तार पटेल यांनी त्यांच्या पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. व सर्व समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले.