जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे जेष्ठ पत्रकाराचा सन्मान…!

प्रतिनिधी एरंडोल – जळगाव जिल्हा पत्रकार संघ,जळगाव व जेष्ठ पत्रकार लढा समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे ६ जानेवारी २०२५ सोमवार रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार दिन कार्यक्रम पत्रकार भवनात
आयोजित करण्यात आलेला होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. विजय बापू पाटील (अध्यक्ष विश्वस्त मंडळ) हे होते. तसेच प्रमुख अतिथी मा.श्री.गणेश मुळे
संचालक माहिती व जनसंपर्क ,मा.श्री.अशोक भाटीया पत्रकार भवन समिती अध्यक्ष,
मा.श्री.प्रमोद पाटील अध्यक्ष जिल्हा पत्रकार संघ जळगाव मा.श्री.भिका चौधरी अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ,जेष्ठ श्रेष्ठ पत्रकार धो.ज.गुरव,मुकूंद एडके,फारुख शेख सचिन सोमवंशी,विवेक खडसे,दिलीप शिरुडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.


          या कार्यक्रमात एरंडोल येथील जेष्ठ पत्रकारतसेच एरंडोल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार मा.श्री.बी.एस.चौधरी यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.जेष्ठ पत्रकार बी.एस.चौधरी यांनी एरंडोल शहरातील अनेक समस्यांना व प्रश्नांना प्रभावीपणे वृत्तपत्रात मांडून परखड भुमिका घेत शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.ते आपल्या वृत्तपत्र लेखनातून सातत्याने एरंडोल शहराच्या विकासात्मक बाबींवर प्रकाश टाकत जनतेला व प्रशासनाला जाग आणण्याचे कार्य अखंडपणे दिपस्तंभासारखे करीत असतात.तसेच एरंडोल येथील दुसरे जेष्ठ पत्रकार व व्यंगचित्रकार प्रा.शरद महाजन यांना सुध्दा यावेळी मान्यवरांच्या हस्ते  गौरविण्यात आले.प्रा.शरद महाजन हे अनेक वर्षांपासून पत्रकार व व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत आहेत.संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या सामना मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक व दैनिक महाराष्ट्र सारथी वृत्तपत्राचे ते नियमित व्यंगचित्रकार असून दैनिक नवराष्ट्र वृत्तपत्राचे ते पत्रकार आहेत.आतापर्यंत उत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले असून हजारो व्यंगचित्रांचे रेखाटन त्यांनी आतापर्यंत केलेले आहे.
        यावेळी प्रमुख वक्ते मा.डॉ. गणेश मुळे (संचालक माहिती व जनसंपर्क) यांनी प्रशासन व पत्रकारिता या विषयावर पत्रकारांना मार्गदर्शन केले.तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणातून मा.श्री.विजय बापू पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच जिल्हाध्यक्ष मा.श्री.प्रमोद अण्णा पाटील यांनी जिल्ह्यातील प्रसिद्धीपासून दूर असलेले परंतु समाजसेवा व जनजागृती करणाऱ्या अवलीयांना सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
        या कार्यक्रमासाठी एरंडोल पत्रकार संघाचे शहराध्यक्ष कैलासभाऊ महाजन,चंद्रभान पाटील, प्रल्हाद पाटील, पंकज महाजन आदी पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button