चौपदरीकरणात अपुर्णावस्थेतील कामे व समस्याबाबत पत्रकारांची भुमिका होकायंत्राची…..!
यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील यांचे प्रतिपादन…!
प्रतिनिधी एरंडोल- येथील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अपुर्णावस्थेतील समांतर रस्त्यांसह इतर संसाधने व उड्डाणपूल याबाबत स्थानिक पत्रकार बांधवांनी होकायंत्राची भुमिका बजावत राजकीय क्षेत्रातील नेत्यांना संघटीत केले.ही पत्रकारांची कामगिरी खऱ्या अर्थाने दर्पणकारांना अभिवादन ठरणार आहे.असे गौरवोद्गार यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित राजेंद्र पाटील यांनी केले.
यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळ व डि.डी.एस.पी.महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त तालुक्यातील पत्रकारांचा १० जानेवारी २०२५ रोजी शुक्रवारी सन्मान करण्यात आला.त्याप्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलत होते.
प्रारंभी जेष्ठ पत्रकारांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.तदनंतर सरस्वती, बाळशास्त्री जांभेकर व संस्थापक अध्यक्ष दि.शं.पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी शाल,पेन व डायरी व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित पत्रकारांचा सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.जे.पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ.हेमंत पाटील यांनी केले.शिवाजीराव अहिरराव,बी.एस.चौधरी, प्रल्हाद पाटील व जावेद मुजावर यांची समोयोचित भाषणे झाली.प्रा.एन.ए.पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.
प्रा.बालाजी पवार,प्रा.आर.एस.पाटील, प्रा.राहुल पाटील, प्रा.उमेश गवई, प्रा.सुरज वसावे, प्रा.नितीन पाटील, प्रा.शेखर पाटील,डॉ.रेखा साळुंखे, डॉ.सविता पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.यावेळी शहरी व ग्रामीण पत्रकार व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.