एरंडोलची अंजनी नदी झाली गटारगंगा-अधिकार्यांचे अक्षम्य दुर्लक्ष-संताप

पावसाळा जवळ आला तरी स्वच्छता नाही-आमदार, नामदारांनी तरी लक्ष द्यावे-अपेक्षा
प्रतिनिधी – पावसाळा जवळ आला (एक महिन्यातच) जिकडे-तिकडे (पुणे-मुंबई आदी) नाले-नदी स्वच्छता केली जात असून नागरीकांच्या जिवीताची, आरोग्याची काळजी घेतली जाते. परंतू एरंडोलला मात्र अंजनी नदीची स्वच्छता तर नाहीच, काटेरी झुडूपे, घाण देखील काढली जात नाही यास म्हणावे तरी काय ? असा संपप्त सवाल केला जात आहे.
अंजनी नदीची अक्षरश: गटारगंगा झाली तरी अधिकारी वर्गाला (संबंधित) ना खेद ना खंत ! अंजनी नदी ऐतिहासिक असून तिच्यावर धरण बांधून पाणी अडविले खरे परंतू बारमाही वाहणारी नदीचे अस्तित्वच संपुष्टात आल्याने गटारगंगा झाली आहे. संपूर्ण एरंडोलचे घाण पाणी, गटारींद्वारे, सार्वजनिक शौचालयांचे घाण-दुर्गंधीयुक्त पाणी अंंजनी नदीत सोडल्यामुळे पशू-पक्षांसह मनुष्यप्राण्याला देखील हानीकारक असल्याने प्रदूषण मंडळ झोपले आहे काय ? असाही सवाल आहे. ऐन पावसाळ्यात याच घाण पाण्यामुळे सर्वत्र रोगराई पसरण्याचा धोका आहे. तसेच सदर घाण पाण्यात मोकाट कुत्रे, डूकरांचा देखील मोठ्या प्रमाणात वावर असल्याने सर्वत्र रोगराई आणि डासांचे साम्राज्य पसरत आहे.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील असून देखील आणि एरंडोलची त्यांना चांगलीच माहिती असून देखील अधिकारी वर्गाने त्यांना सांगू नये ही खेदाची बाब आहे. त्यामुळे उशिरा का असेना परंतू अंजनी नदीची स्वच्छता व्हावी. तालूक्याचे आमदार अमोलदादा पाटील यांचेकडे निवेदनाद्वारे स्वच्छतेची मागणी केली असून तातडीने पावसाळ्यापूर्वी स्वच्छता व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.