शहरातील कासोदा फाट्यावरील मिडीयन कट बंद केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट..

कट बंद केल्यामुळे नागरिकांचा जीवाला धोका वाढला….
प्रतिनिधी – भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून एरंडोल शहरातील जाणारा महामार्ग क्रमांक ५३ वर कासोदा फाट्यावरील मिडीयन कट बंद केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान सदर विभागामार्फत ही मिडीयन स्थानिकांकडून तोडण्यात आल्याचे आल्याचे म्हटले आहे त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे देखील म्हटले आहे यामुळे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सदर मिडीयन कट बंद करण्याचे आदेश परियोजना निर्देशक शिवाजी पवार यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे दरम्यान सदर पत्र हे दि. १७ जानेवारी २०२५ रोजी महामार्ग चौपदरीकरण समस्या निवारण नागरिक कृती समितीला देण्यात आले आहे.
दरम्यान महामार्ग चौपदरीकरण समस्या निवारण नागरिक कृती समिती एरंडोल यांच्यातर्फे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे शहरातील कासोदा रस्त्यावर व्हेईकल अंडरपास बांधण्याचे काम या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी केली होती त्यानुसार त्या कामासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याकरिता क्षेत्रीय कार्यालय नागपूर यांच्यामार्फत पुढील कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे म्हटले असून एरंडोल शहरांमधील कि.मी. ४६०.३८० उजव्या बाजूला असलेल्या छोट्या मुलाचे रुंदीकरण कि.मी. ४६१.८२० ते कि.मी. ४६२.८९० पर्यंतच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याच्या बांधकाम कि.मी. ४८९.४८० ते कि.मी. ४८९.६५० पर्यंत दोन्ही बाजूचा सेवा रस्ता इत्यादी कामा करिता निविदा प्रसिद्ध करण्याचे काम क्षेत्रीय कार्यालय नागपूर येथे प्रगतीपथावर असल्याचे देखील म्हटले आहे त्यामुळे हा शोधा रस्त्यावर स्थानिकांकडून रस्त्याची मिडीयन तोडण्यात आलेली असल्याचे म्हटले असून यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे देखील म्हटले आहे त्यामुळे सदर मिडीयन सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने बंद करण्याचे दिशा समिती बैठकीत दि. ४ जानेवारी २०२५ रोजी सदर विषयावर चर्चा होऊन सदर मिडीयन कट बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तरी त्याची अंमलबजावणी दि. १ एप्रिल २०२५ रोजी होऊन सदर मिडीयन कट बंद करण्यात आला.
सदर मिडीयम कट स्थानिकांकडून करण्यात जरी आला असला तरी सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून सुरक्षेच्या दृष्टीने सिग्नल व गतिरोधक बसवण्यात आले आहेत. बंद करण्यात आलेल्या मिडीयन कट च्या बाजूने डिव्हायडर वरून दुचाकी वाहनधारक आपल्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून आपले वाहन नेत आहेत. यामुळे भविष्यात फार मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.