ताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

एरंडोल महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे समुपदेशन या विषयावर कार्यशाळा संपन्न….

प्रतिनिधी एरंडोल : येथील दादासाहेब दि. श. पाटील कला व  वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, तसेच प्रधान मंत्री उच्चतर शिक्षा अभियान, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने  विद्यार्थ्यांचे समुपदेशन या विषयावर महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातर्फे  एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन  केले. कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष  अमित पाटील याच्या हस्ते करण्यात आले, प्राचार्य डॉ. अनिल पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  संबोधनात  पाटील यांनी आजच्या काळात विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या मानसिक व भावनिक समस्या सोडविण्यात मदत करण्यासाठी अशा कार्यशाळा आयोजित करण्याची गरज अधोरेखित केली.      कार्यशाळा चार सत्रा मध्ये पार पडली.
             पहिल्या सत्रात झेड. बी. पाटील महाविद्यालयातील प्रा. डॉ. शशिकांत खलाने यांनी आंतर वैयक्तिक संबंध व विवाहपूर्व समुपदेशन या विषयावर मार्गदर्शन केले.  दुसऱ्या सत्रात मानसशास्त्रीय समस्या या विषयावर क. ब. चौ. उ. म. वि. जळगाव च्या डॉ. वीणा महाजन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सांभाजी नगर येथील प्रा. डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी मानसिक स्वास्थ्यासाठी भावनिक व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले.  शेवटच्या सत्रात अहमदनगर कॉलेजचे प्रा. डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांनी करियरकरीता व्यक्तिमत्व विकास या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
          यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, माजी प्रभारी प्राचार्य एन. ए. पाटील, प्रा. ए. टी. चिमकर, डॉ. नरेंद्र तायडे, डॉ. राम वानखेडे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. सोपान साळुंखे, डॉ. स्वाती शेलार, प्रा. नागसेन बागुल उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रेखा साळुंखे यांनी केले तर डॉ. चंद्रकांत पाटील यांनी सूत्रसंचलन केले.
                 प्रास्ताविकात डॉ. रेखा साळुंखे यांनी युवकांमध्ये ताण-तणाव, चिंता, नैराश्य, आत्महत्या या मानसिक समस्यांच्या प्रमाणात लक्षणीय प्रमाणात वाढ होत असल्याचे सांगून कार्यशाळेचा आयोजनाचा उद्देश व महत्त्व विशद केले. 
          कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. शर्मिला गाडगे, डॉ. सविता पाटील, प्रा. सुनील सजगने, प्रा. मनिषा बाविस्कर, प्रा. उमेश सूर्यवंशी, श्री. प्रसन्ना भालेराव तसेच विद्यार्थ्यांमध्ये  निकिता, दीपाली, प्रिया, परमेश्वर, दुर्गेश, गिरीश, सिद्धार्थ  यांनी सहकार्य केले. कार्यशाळेत विद्यापीठ परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील २५० विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button