जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र
महात्मा फुले हायस्कूल येथे भारतीय प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.

प्रतिनिधी एरंडोल – येथील महात्मा फुले हायस्कूल शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी शालेय समितीचे चेअरमन अण्णासो रमेश जगन्नाथ महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आला यात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अण्णा सो विजय महाजन भाऊसो सुदर्शन महाजन अरुण कुमार माळी घनश्याम माळी कुणाल महाजन सुरेश देशमुख पी. जी.चौधरी शांताराम महाजन व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विनोद जाधव यांनी तर सूत्रसंचालन सुनील माळी व गोपाल चौधरी यांनी केले कार्यक्रम यशस्वीते करता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.