कोणतीही अपेक्षा न बागळता जनजागृती करणारे कासोद्याचे मधुकर ठाकूर…

प्रतिनिधी एरंडोल- तालुक्यातील कासोदा येथील मधुकर जुलाल ठाकूर हे स्वतःच्या सायकलीवर गावोगावी जाऊन लोकांना पर्यंत जनजागृती करून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न करा मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यावर लग्न करा . हुंडा घेऊ नका , हुंडा देऊ नका , हुंडा मागू नका . लग्नापूर्वी रक्त तपासून लग्न करा. कमी वयात लग्न करने म्हणजे बालविवाह करणे. कायद्याचे बंधन पाळा , बालविवाह टाळा .चला आता सुरुवात करा, बालविवाह करणे बंद करा. बालविवाह जोडणारे व लावणारे खरे गुन्हेगार असतात. बालविवाह केल्यास दोन वर्षाची शिक्षा व एक लाख रुपये दंड आहे. जन्म-मृत्यू- आणि विवाहाची नोंद वेळेवर करा. जन्म-मृत्यू-विवाहाची नोंद करणे काळाची गरज आहे. असे वेगवेगळे घोष वाक्य लिहून ग्रामीण भागात स्वयंपूर्तीने व स्व-खर्चाने जनजागृती करत असतो. गावागावात जाऊन सायकलीला लाऊड स्पिकर लाऊन दवंडीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत कायद्या विषयी महिती देत असतो. त्याच्या या कामाचे अनेक वेळा अधिकाऱ्यांनी व राजकारण्यांनी कौतुक करुन त्याचा सत्कार देखील केला आहे.