जळगावमहाराष्ट्र

एरंडोलचे निंबा कुंभार द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने सन्मानित

एरंडोल (प्रतिनिधी) – येथील गुरूकुल कॉलनीतील रहिवासी निंबा पुंडलिक कुंभार यांना नुकतेच पालघर येथे आयोजित कार्यक्रमात द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पालघर येथे कर्तव्य संमेलन कला, पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती महाराष्ट्र राज्यतर्फे आयोजित मॉं तुझे सलाम या कला व सांस्कृतिक कार्यक्रमात एरंडोलचे साहित्यिक निंबा पुंडलिक कुंभार यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा निवृत्त कर्नल रामेश्वर शर्मा आणि प्रसिध्द अभिनेत्री नयना आपटे यांचे हस्ते द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी निंबा कुंभार लिखीत एक गटसचिव (आत्मकथा) पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले. सदर मानाचा पुरस्कार मिळाल्याने मला मनस्वी आनंद झाला असून आयोजकांचे मनापासून आभार मानत असल्याचे कुंभार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
निंबा कुंभार यांना पुरस्कार मिळाल्याने सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसिलदार अरूण माळी, उपाध्यक्ष जाधवराव जगताप, सचिव विनायक कुळकर्णी, प्रा. शिवाजीराव अहिरराव, निंबा बडगुजर, पी. जी. चौधरी सर, सुरेश देशमुख यांचेसह दिपक बाविस्कर, कैलास महाजन, अ‍ॅड. दिनकर पाटील, विलास जगताप, राजेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजु पाटील, रवी पाटील, मनोज पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button