जळगावमहाराष्ट्र

जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी घेऊन आलेला पोलिसाला अचानक झटका आल्याने ते खाली कोसळले.

प्रतिनिधी अमळनेर : जिल्हा कारागृहातून आरोपी घेऊन आलेला एक पोलीस न्यायालयातच कोसळला मात्र वकिलाच्या तत्परतेने त्याला वेळीच दवाखान्यात दाखल करण्यात आल्याने पोलिस आता धोक्याच्या बाहेर आहे.
      अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी घेऊन आलेले सहाय्यक फौजदार संजय गायकवाड यांना कोर्टात अचानक झटका आल्याने ते खाली कोसळले. उपस्थित सर्व जण हादरले. जवळच उभे असलेले ऍड दिनेश पाटील तात्काळ मदतीला धावले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असे समजून त्यांनी त्यांना सीपीआर दिला आणि प्राथमिक उपचार करून पोलिस अधिकाऱ्याला डॉ निखिल बहुगुणे यांच्याकडे दाखल केले. डॉ बहुगुणे यांनी त्यांच्यावर उपचार केले. तोपर्यंत गायकवाड यांच्या मुलांना व कुटुंबाला घटना कळवण्यात आली. गायकवाड यांच्या मेंदूत रक्तपुरवठा कमी झाल्याने त्यांना झटका आला होता. मुले त्यांना पुढील चाचण्यांसाठी जळगाव येथे दवाखान्यात घेऊन गेले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असे डॉ बहुगुणे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button