क्राईममहाराष्ट्र

शिर्डीहून देवदर्शन घेऊन मुक्ताईनगरला परतणाऱ्या मुख्याध्यापकाच्या पत्नीचा कार अपघातात मृत्यू,पती व मुले जखमी….!

प्रतिनिधी एरंडोल – मुक्ताईनगर येथील कोथडी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेश वासुदेव पाटील हे रविवारी सुटी असल्यामुळे आपल्या परिवाराला नेऊन कारने शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला गेले.दर्शन आटोपून ते रात्री घराकडे परतत असताना राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळकोठा नजीक राजेश पाटील यांची कार व कंटेनर अचानक रस्त्यावर आल्याने दोन्ही वाहनांचा अपघात झाला.ही दुर्घटना रविवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली.त्यात रूपाली राजेश पाटील,वय ४० वर्षे यांचा मृत्यू झाला.तर मृत महिलेचे पती, मुलगा गुरूनाथ ,मुली खुशी व स्वरा हे चौघे जखमी झाले.याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        मुक्ताईनगर येथील कोथडी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक तथा पत्रकार राजेश वासुदेव पाटील हे आपल्या परिवारासह २३ फेब्रुवारी २०२५ रोजी एम एच १९ सी क्यु ७००९ क्रमांकाच्या स्विफ्ट कारने शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन रात्री घराकडे परतत असताना पिंपळकोठा नजीकच्या यु.पी.ढाब्यासमोर डब्ल्यु बी २३ एफ ९४७२ क्रमांकाचा कंटेनर अचानक रस्त्यावर आल्याने कार व कंटेनर या वाहनांमध्ये दुर्घटना होऊन राजेश पाटील यांच्या पत्नी रूपाली पाटील यांचे अपघाती निधन झाले.तर राजेश पाटील, मुलगा व दोन्ही मुली हे जखमी झाले.
        एरंडोल ग्रामीण रूग्णालयात मृत महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले.तर जखमींवर उपचार करण्यात आला.पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल काशिनाथ पाटील, मिलिंद कुमावत, अनिल पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button