एरंडोल महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन संपन्न.

प्रतिनिधी एरंडोल- येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एरंडोल येथे ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष माननीय दादासाहेब अमित राजेंद्र पाटील होते .प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.जे. पाटील उपस्थित होते. मा.अमित दादा पाटील यांनी वि. वा. शिरवाडकरआणि विर एकलव्य यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले .तर प्राचार्य डॉ. ए.जे.पाटील यांनी सुमनांजली अर्पण केली. यावेळी अध्यक्षीय भाषणात माननीय दादासाहेब अमित पाटील यांनी वि वा शिरवाडकर यांचे मराठी साहित्यातील योगदान व भरीव कार्याची माहिती दिली. तसेच वीर एकलव्य यांचे कार्य देखील केवळ आदिवासी समाजासाठीच नव्हे तर सर्व समाजासाठी शौर्याचे आणि आदर्शवत आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजाने भावी काळात प्रगती करीत राहिले पाहिजे असे गौरवोदगार काढले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए . जे.पाटील यांनी देखील आपले विचार व्यक्त करून वि.वा.शिरवाडकर आणि वीर एकलव्य यांच्या कार्याचा आढावा व्यक्त केला .या कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य डॉ. ए . ए.बडगुजर, माजी प्रभारी प्राचार्य प्रा. एन.ए .पाटील, प्रा.के. जे. वाघ, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.टी. चीमकर(मराठी विभाग प्रमुख) यांनी केले .तर आभार डॉ.सचिन पाटील यांनी मांडले.