महाराष्ट्रशैक्षणिक

एरंडोल महाविद्यालयात ‘स्पर्शगंध’  क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन….


प्रतिनिधी एरंडोल:- येथे डीडीएसपी महाविद्यालयात  ‘स्पर्शगंध’क्रीडा व सांस्कृतिक दोन दिवसीय महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले.  मान्यवरांच्या हास्ते  दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अमित पाटील हे होते. प्राचार्य डॉ.ए.जे‌ पाटील, डॉ. अरविंद बडगुजर यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असतो. असे संस्था अध्यक्ष अमित पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
                  कार्यक्रमांतर्गत
शैक्षणिक वर्ष २०२४/२५ मध्ये वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील   कला,विज्ञान व वाणिज्य शाखेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. विज्ञान प्रश्नमंजुषा व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
             यावेळी  विद्यार्थ्यांनी रॅम्प वॉक, नृत्य, फनी गेम्स, शेलापागोटे या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला.  विद्यार्थ्यांनी  उत्तर भारतीय , दक्षिण भारतीय व महाराष्ट्रीयन पोशाखात केलेल्या रॅम्प वॉकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
                   माजी प्रभारी प्राचार्य एन. ए. पाटील, हिंदी विभाग प्रमुख डॉ. स्वाती शेलार ,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक एन. बी.  गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. एस. वानखेडे. यांची मंचावर उपस्थित होती.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची पाटील व जयश्री पाटील यांनी केले. आभार दिशा ब्राह्मणे . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button