महाराष्ट्रराज्य

प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल स्पर्धेत एरंडोल तालुक्यातील राजकुमार ठाकूर देशात दुसरा क्रमांक..

प्रतिनिधी एरंडोल – कोल्हापूर येथे झालेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल स्पर्धेत मालेगांव येथील लॉजिक्सॉन प्रोऍक्टिव्ह अबॅकस अँड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे १७ विद्यार्थी विजयी झाले.६ मिनिटात १०० गणिते सोडविणे असे स्पर्धेचे स्वरूप होते. भारतातील ५१० हून अधिक अबॅकस केंद्र व ३८५५ विद्यार्थी ह्या स्पर्धेसाठी पात्र ठरले होते.
स्पर्धेच्या युगात कमीत कमी वेळात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या गणितीय क्रिया करून आपली बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी या स्पर्धा पद्धतीचा उपयोग होत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक जडणघडणीत मोलाची भर पडत असते.
ह्या स्पर्धेत लॉजिक्सॉन इन्स्टिट्यूट मधील  रामकुमार ठाकूर ह्या विद्यार्थ्याने भारतात द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच विहान सावळे (पाचवा क्रमांक), खूश चूघ (पाचवा क्रमांक), पलश कासलीवाल (सहावा क्रमांक), उत्कर्ष निकम (सहावा क्रमांक), अदिती वडनेरे (दाहावा क्रमांक), नैतिक यादव (दाहावा क्रमांक), अवधूत आमले (दाहावा क्रमांक), दोयल ताजने (चौदावा क्रमांक), अथर्व खैरनार (चौदावा क्रमांक), खुशाल साबळे (पंधरावा क्रमांक), व दिशा चुघ, भाग्यश्वरी साळुंखे, सुरभी प्रजापत, भूमी खोडके, यतिशा बाविस्कर, हार्दिक पवार हे विद्यार्थी finalist ठरले.
सर्व विद्यार्थ्यांना लॉजिक्सॉन प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे संचालक  भावेश अहिरे व संचालिका राधिका अहिरे, नीलम सावळे मॅडम, रेखा भामरे मॅडम व  दीपिका वडनेरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.राजकुमार ठाकूर हा प्रि. प्रायमारी. सेमी इंग्लिश स्कुल मालेगाव शाळेतील विद्यार्थी आहे.राजकुमार हा रा.नादखुर्दे, ता. एरंडोल जि. जळगांव चा रहिवाशी आहे. रामकुमार लुभान ठाकूर यांचा मुलगा आहे त्याचे वडील शेती काम करतात. त्याच्या  उज्वल भविष्यासाठी पुढील वाटचालीस  मित्रमंडळी व गावकऱ्यांकडून शुभेच्छा देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button