विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही – अध्यक्ष शरद काबरे. यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती.

प्रतिनिधी एरंडोल – विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता संचालक मंडळ घेत असल्याची ग्वाही
व वादळी पावसामुळे काबरे विद्यालयाच्या इमारतीवरील तुटलेले कौले त्वरित बदलविण्यात येणार असल्याची माहिती एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे
अध्यक्ष शरद काबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.महेश काबरे,सचिव राजकुमार मणियार,संचालक डॉ.नितीन राठी,सुनील झंवर,परेश बिर्ला,अनिल बिर्ला यांचेसह
पदाधिकारी उपस्थित होते.
शहरात ११ जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे काबरे विद्यालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून,महसूल प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करण्यात आल्याचे अध्यक्ष शरद काबरे यांनी सांगितले.वादळामुळे काबरे
विद्यालयाच्या इमारतीवरील कौले तुटले आहेत.संचालक मंडळाने वादळामुळे
झालेल्या नुकसानीची माहिती घेतली असून इमारतीवरील तुटलेले कौले तातडीने बदलण्यात येणार असल्याचे सांगितले.उत्राण येथील जाजू विद्यालयाला तारेचे संरक्षक कंपाउंडच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.पाळधी येथील संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले असून एरंडोल येथील काबरे विद्यालयाच्या प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले असून याठिकाणी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना सर्वप्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी संस्थेचे पदाधिकारी प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची ग्वाही अध्यक्ष काबरे व पदाधिका-यांनी यावेळी दिली.संस्थेची निवडणूक ऑगस्ट २३ मध्ये झाली असून माझ्या नेतृत्वाखालील पॅनलच्या सर्व उमेदवारांवर सभासदांनी विश्वास दाखवून आमच्या बाजूने कौल दिला होता.मात्र संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत
काबरा,सचिव श्रीकांत घनश्याम काबरे,सहसचिव सागर मानुधने व त्यांचे काही
संचालक संस्थेच्या कामकाजात कायम बाधा आणत असल्याच्या कारणावरून १८ मे
रोजी झालेल्या सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपाध्यक्षांसह त्यांच्या संचालकांचे सभासदत्व व पदे रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.उपाध्यक्ष,सचिव,सहसचिव यांचेसह सभासदत्व रद्द झालेल्या पदाधिका-यांच्या जागेवर नवीन संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.संस्थेचा अध्यक्ष या नात्याने पदाधिका-यांमधील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला,मात्र उपाध्यक्ष,सचिव व त्यांच्या सहका-यांनी
कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.विरोधक खोट्या अफवा पसरवून पालक व सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असून विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी
केले.विद्यार्थ्यांचे हित,संस्थेची प्रगती,विद्यार्थ्यांना पुरेशा
प्रमाणावर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी संस्थेचे सर्व
नवनियुक्त पदाधिकारी एकत्रितपणे काम करत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.