जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र
एरंडोल येथे तहसील कार्यालयात आज रोजी लोकशाही दिनाच्या आयोजन…

प्रतिनिधी एरंडोल:-तालुक्यातील नागरिकांच्या विविध विभागाशी संबंधित तक्रारी विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी २० जानेवारी २५ रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय एरंडोल (बीएसएनएल कार्यालय आवार) येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे . या कार्यक्रमांतर्गत नागरिकांच्या असलेल्या समस्या बाबतचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
तरी नागरिकांनी आपल्या तक्रारी अर्जासह आवश्यक कागदपत्र घेऊन यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले आहे.