जळगावधार्मिकमहाराष्ट्र
श्री क्षेत्र पद्मालय येथील कमळ तलावाचे संवर्धन करण्या संदर्भात पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांना आमदार अमोल पाटील यांनी दिले निवेदन.

प्रतिनिधी एरंडोल – येथील श्री क्षेत्र पद्मालय येथील कमळ तलावाचे संवर्धन योजने अंतर्गत संवर्धन करण्या करिता पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजा मुंडे यांची आमदार अमोल चिमणराव पाटील यांनी भेट देऊन निवेदन दिले.
श्री क्षेत्र पद्मालय हे मोठे पर्यटन स्थळ असून पद्मालय येथील कमळ तलावाचे पर्यावरण विभागाच्या सरदार सरोवर संवर्धन योजने अंतर्गत संवर्धन करण्या करिता सकारात्मक चर्चा झाली.या प्रकल्पाला व मतदार संघातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना नीती उपलब्ध करण्या संदर्भात ना. पंकजा मुंडे तलावाबाबत लवकरच निधी उपलब्ध करू देऊ असे ठोस आश्वासन दिले.
याचबरोबर आ. अमोल पाटील यांनी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर देखील चर्चा करून लेखी पत्रव्यवहार देखील केला.