एरंडोल बस आगारातर्फे रस्ते सुरक्षा अभियानाचा शुभारंभ……!
प्रतिनिधी एरंडोल – येथे राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या बस आगारातर्फे रस्ते सुरक्षा अभियानाचा शुभारंभ पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या हस्ते ११ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आला.यावेळी अभियानाचा शुभारंभ फलकाची फित कापून करण्यात आला.सदर अभियान ३१ जानेवारी २०२५ पर्यंत राबविण्यात येणार आहे.अभियान उदघाटनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डि.डी.एस.पी.महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील हे होते.याप्रसंगी प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या छाया दिदी व डॉ.सुरेश पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविक बसस्थानक प्रमुख गोविंदा बागुल यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर मोराणकर व सतीश महाजन यांनी केले.आभारप्रदर्शन आगार व्यवस्थापक विजय पाटील यांनी केले.याप्रसंगी चालक,वाहक, तांत्रिक कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.