गुजर हद्द शिव ते टोळी शिव रस्ता पूर्ववत चालू करावा, शेतकऱ्यांची जोरदार मागणी…
प्रतिनिधी एरंडोल:- गुजर हद्द शिव ते टोळी शिव रस्ता बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत तरी सदर रस्ता पूर्ववत सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
एरंडोल धरणगाव राज्य महामार्गाला लागून असलेला शिव रस्ता हा सरकारी गट क्रमांक १२८६ च्या पूर्व बाजूस लागून असलेल्या वरील शिव रस्ता हा पूर्वी चालू होता परंतु अचानक गट क्रमांक १४१५ व १४१६ या गटाच्या शेतकऱ्यांनी चालू असलेला रस्ता खोदून कायमस्वरूपी बंद केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे शेतात ये जा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर दत्तात्रेय रामचंद्र पाटील, गुरुप्रसाद पाटील, जी.टी. पाटील, गोपाल महाजन, ज्ञानेश्वर पाटील, सदाशिव पाटील, हिरालाल महाजन, राहुल महाजन, लक्ष्मण पाटील, रवींद्र पाटील, विश्वनाथ पाटील, सुभाष पाटील, शिवानंद पाटील, गोरख पाटील आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.