जळगावमहाराष्ट्र

जीवनात यशासाठी आंतरिक प्रेरणा महत्त्वाची… तहसीलदार प्रदीप पाटील

प्रतिनिधी – जीवनात यशासाठी आंतरिक प्रेरणा महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतल्यास ते प्रत्येक क्षेत्रात गगन भरारी घेतील असा दृढ आत्मविश्वास तहसीलदार प्रदीप पाटील यांनी व्यक्त केला.ते येथील ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गुण गौरव सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय पदावरून बोलत होते.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माऊली संस्थेचे संचालक गोरखनाथ महाजन, ऊर्जा संस्थेचे संयोजक प्रवीण महाजन, गौतम सोनवणे, सुरेखा सोनवणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

   यावेळी यश गौतम सोनवणे या विद्यार्थ्याने जीईई च्या मेन्स परीक्षेत 99.62 टक्के गुण प्राप्त घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल त्याचा तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्वामी विवेकानंद यांचा ग्रंथ देऊन यथोचित गौरव करण्यात आला.यावेळी प्रवीण महाजन यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की,यश सोनवणे याचे यश कुटुंब व समाजसाठी उभारी देणारे आहे,त्याच्या सारख्या गुणवंतांच्या पाठीवर समाजानेही कौतुकाची थाप दिली पाहिजे.यावेळी यशाच्या आई वडीलांचाही तहसिलदार प्रदीप पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यश हा एका सामान्य कुटुंबातल्या ऑटो रिक्षा चालक गौतम सोनवणे यांचा मुलगा असून त्याच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

    या कार्यक्रमाप्रसंगी आबा सोनवणे,मेघा महाजन,राज सोनवणे, तेजस्विनी महाजन इ.उपस्थित होते.यशचे आई वडील परिस्थितीमुळे फारसे शिकू शकले नाहीत पण‌ मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांची धडपड अभिनंदनीय व‌ कौतुकास्पद अशीच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button