क्राईमजळगावमहाराष्ट्र

अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची कारवाई.
एक लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा दाखल.


प्रतिनिधी अमळनेर :- धुळे-चोपडा महामार्गावरील मंगळ ग्रह मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अवैद्य रित्या दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अमळनेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली असून एक लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांना अमळनेर शहरातून प्याजो रिक्षा मध्ये अवैद्य दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.त्यामाहितीच्या आधारावर  पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद सदांनशिव,प्रशांत पाटील,उज्ज्वल म्हस्के,निलेश मोरे आदींचे पथकाने चोपडा रस्त्यावरील मंगळ ग्रह मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सदर प्याजो रिक्षावर छापा टाकला.रिक्षा चालक धनराज अशोक चौधरी वय ४६ रा.अमळगाव ता.अमळनेर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून २३ हजार ४० रुपयांची मॅक्डोल व्हिस्की १४४ कॉटर,१८ हजार २४० रुपयांची रॉयल स्टॅग ९५ कॉटर,७ हजार ६८० रुपयांची इम्पेरीयल ब्लु ४८ कॉटर,९ हजार १२० रुपयांची रॉयल चॅलेंज ४८ कॉटर व ७० हजार रुपयांची प्याजो रिक्षा असा १ लाख  २८ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर माल प्रवीण काशिनाथ चौधरी रा.अमळगाव ता.अमळनेर यांचा असल्याने त्याच्या वर व गाडी चालकांवर पोलीस कॉन्स्टेबल उज्ज्वल म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांत मुंबई दारूबंदी अधिनियम ६५ अ,६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button