जळगावमहाराष्ट्र

एरंडोल – धरणगाव माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत झाले ८९.८७ टक्के मतदान.

प्रतिनिधी – एरंडोल – धरणगाव माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज रोजी झालेल्या मतदानात ३४२ मतदारांपैकी ३०७ मतदारांनी मतदान केले.एकूण ८९.८७ टक्के मतदान झाले.
एरंडोल – धरणगाव माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण ११ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली.यात सर्वसाधारण गटातून ७ उमेदवार,अनु.जाती जमाती मतदार संघातून २ उमेदवार आपले नशीब आजमावत होते तर माघारीच्या दिवशी महिला राखीव गटातून २ महिला,इतर मागास वर्गातून १ तर भ.वि.जाती जमाती गटातून १ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.आज दि.२३ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून रा.ती.काबरे विद्यालयात मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली.दुपारी ४ वाजेपर्यंत संपूर्ण मतदान प्रक्रिया झाली.यावेळी एकूण ३४२ मतदारांपैकी ३०७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.सर्वसाधारण गटातून पाटील रविंद्र शांताराम यांना २१९,पाटील वासुदेव तानाजी २१५,पाटील सुनील रामरतन २०५,पाटील विजय उत्तम १९५,सोनवणे भैय्यासाहेब दिपक १७५,सुर्यवंशी गणेशसिंह रामसिंह १६३ तर अनुसूचित जाती जमाती गटातून सावकारे संतोष जगन्नाथ १५० मते घेऊन विजयी झाले.तर सर्वसाधारण गटातून माळी भगीरथ सिताराम हे पराभूत झाले असून अनु.जाती. जमाती गटातून विनोद बाबुलाल सपकाळे हे अवघ्या दोन मतांनी पराभूत झाले .दरम्यान महिला राखीव गटातून पाटील रुपाली उत्तमराव,महाजन आरती सुभाष,इतर मागास वर्गातून महाजन सचिन दुर्गादास व . वि.जा.भ.ज.व विमाप्र गटातून संदीप प्रकाश मनुरे हे बिनविरोध विजयी झाले. दरम्यान संतोष सावकारे व भैय्यासाहेब सोनवणे हे एकाकी लढत देऊन विजयी झाले.
निवडणूक शांततेत व शिस्त बद्ध पद्धतीने राबविण्यासाठी तालुका सहकार निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.एस.पवार,केंद्राध्यक्ष म्हणून व्हि.बी.पवार तर केदारनाथ सोमाणी,एस.टी.ठाकूर,एम.आर.चव्हाण,पी.एफ.बाविस्कर यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button