एरंडोल येथे पाटचारीत सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.

प्रतिनिधी – एरंडोल येथील विखरण शिवारात पाटचारीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.याबाबत विखरण पोलिस पाटील विनायक संतोष पाटील यांच्या खबरीवरून एरंडोल पोलिसांनी सदर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे व पुढील तपासणी कामी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनवरून मिळालेल्या माहितीनुसार
आज दि.25/03/2025 रोजी सकाळी 10.30 वा. चे सुमारास पोलिस पाटील संतोष पाटील हे विखरण शिवारातील शेतात जात असतांना त्यांना जवखेडे रस्त्यावरील लोटन गबा धनगर यांचे शेत गट नं. 347/1 चे पाटाजवळ लोकांची गर्दी जमा झालेली दिसल्याने त्यांनी माहिती घेतली असता त्यांना पाटाच्या पाण्यात एक पुरुष जातीचे प्रेत पालथ्या अवस्थेत पडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी कॅनॉल पाटाजवळ जावुन पाहीले असता सदर पाटाचे पाणी हे कमी झालेले होते व प्रेत हे पाटात वाकलेली झाडाच्या फांदीत अकडलेले होते. त्याचे जवळच अंदाजे 10 फुट अंतरावर पाण्यामध्ये पाटात एक काळ्या रंगाची बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटारसायकल विना क्रमांकाची ही चावीसह वाहत्या पाण्यात पडलेली दिसली. तसेच एका प्लास्टिकच्या पिशवित भाजीपाला व मेलेली कोंबडी झाडाचे फांदीमध्ये अडकलेली दिसली.त्यानंतर स्थानिकांनी व पोलीसांनी सदरचे प्रेत पाटाच्या पाण्यातुन बाहेर काढले असता सदरचे प्रेत हे पुरुष जातीचे असुन पाण्यात राहील्याने अंगाची कातडी सैल झाली असुन प्रेत हे कुजलेल्या अवस्थेत असल्याने चेहरा ओळखु आला नाही. सदर मयताचे वय अंदाजे 50 ते 55 वर्ष वयाचे त्याचे नाव गाव माहीती नाही अंगात पांढऱ्या रंगाची फुल पँट, आतमध्ये काळसर राखाडी रंगाची शॉर्ट पँट, अंगात फिक्कट पिवळसर रंगाचे हाफ बाहीचे चेक्स शर्ट, कंबरेला लाल रंगाचा कर दोडा असुन सदर ईसमा बद्दल आसपास माहीती घेतली असता त्याचा ठावठिकाणा कळला नाही. सदर पाटाचे पात्र हे अंदाजे 12 फुट खोलीचे असुन त्या पाटातुन आज पहाटेपर्यंत पुर्ण क्षमतेने पाणी वाहत होते असे तेथिल उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले. सकाळी पाटाचे पाणी कमी झाल्याने सदरचे प्रेत व मोटारसायकल पाण्यात दिसुन आली. सदर पाटाचे दोन्ही बाजुला मातीचा रस्ता असुन त्याचा वापर लॉक चारचाकी, मोटारसायकल, बैलगाडी अशा वाहनांचा वापरासाठी करीत असतात तसेच पाटाचे दोन्ही बाजुला सुरक्षतीता म्हणुन काहीएक उपाययोजना केलेल्या नाहीत.सदर इसम हा सोबत असलेल्या मोटारसायकलवरून पाटा लगतच्या रस्त्यावरुन जात असतांना अचानक तोल जावुन पाटाचे पाण्यात पडुन बुडुन दोन ते तीन दिवसांपुर्वी मरण पावला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
सदरचे प्रेत हे पाण्यातुन बाहेर काढल्यानंतर पुढील कारवाई कामी व शवविच्छेदन करणेकामी ग्रामिण रुम्मालय एरंडोल येथे रवाना करण्यात आले.
पुढील तपास एरंडोल पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.राजेश पाटील, पो. काॅ.संदीप पाटील हे करीत आहे.